Email: weavingminds2024@gmail.com
रोज वाजणारी फोनची बेल बंद होते…

कधीतरी रोज सकाळी उठल्यावर ज्या फोनची वाट पाहायची, तो फोन अचानक बंद का होतो? रोजचा तो “Good Morning” चा मेसेज, काळजीची ती एक ओळ आणि दिवसभर गप्पा मारायचा हक्क-सगळं अचानक थांबत.
ब्रेकअप- शब्द छोटा असला तरी परिणाम खोलवर असतो. नातं तुटलं तेव्हा फक्त दोन मानसं नाही, त्यांचे स्वप्न, आठवणी आणि एकमेकांवरच विश्वासाचं जग पण तुटतं.
नातं संपत कसं?
खरं तर नातं एका दिवसात संपत नाही. ते हळूहळू कोसळतं – संवाद कमी होतो, लक्ष देण थांबत, आणि शेवटी – रोज वाजणारी फोनची बेल बंद होते. जेव्हा प्रेमापेक्षा अहंकार मोठा वाढायला लागतो, तेव्हा नात्याची गती मंदावते.
तुटणं ही संधी असू शकते…
तुटणं म्हणजे संपणं असे नाही. अनेकदा ते स्वतःकडे परत पहायची संधी असते. आपण काय शिकलो? काय चुकलं? आणि पुढे नातं असो का नसो, स्वतःशी मैत्री टिकवणं महत्त्वाचं.
शेवटी…
नातं तुटलं म्हणजे आयुष्य संपतं असं नाही. रोज वाजणारी फोनची बेल बंद होते, पण त्यानंतर मनाच्या दारावर स्वतःच्या आत्मभानाची एक नवीन बेल वाजते. पुन्हा एक नवा सूर, नवा प्रवास सुरू होतो आणि हा प्रवास केवळ एतरांसोबत नसतो, तो स्वतःसोबतही असतो.